नवी दिल्ली: करोना विषाणूशी लढा देणाऱ्या जगाला आता केवळ लशीचाच मोठा आधार आहे. कोविडवरील १५० हून अधिक लशींवर जगभरात संशोधन आणि चाचणी सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही लशीला मान्यता देण्यात आलेली नाही. फक्त रशियाच्या Sputnik V या लशीला ऑगस्टमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालाची संपूर्ण जगाला प्रतीक्षा आहे. भारतात देखील कोविड लशींची २/३ टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यांपैरी दोन लशी या भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केल्या आहेत. कोविडची लस केव्हा येणार, कोणाला पहिली लस मिळेल, या प्रश्नाची उत्तरे केंद्रीय आरोग्य मंत्री आज रविवारी देणार आहेत. संडे संवाद या कार्यक्रमाद्वारे आरोग्य मंत्री कोविड लशीची योजना लोकांपुढे मांडतील.

भारतात कोविड लशींची स्थिती काय आहे?

१. ICMR-भारत बायोटेकची Covaxin या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अनेक केंद्रांमध्ये सुरू आहे.
२. झायडस कॅडिलाची ZyCov-D या लशीची चाचणी मानवांवर सुरू आहे.
३. ऑक्सफर्ड-अस्त्राजेनेकाआणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या Covishield या लशीची २/३ टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

चे व्हॅक्सीन पोर्टल झाले लॉन्च

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी २८ सप्टेंबर या दिवशी कोविड-१९च्या व्हॅक्सीन पोर्टलचे उद्घाटन केले होते. इंडियन मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाने (ICMR) हे पोर्टल तयार केले आहे. यावर लोकांना भारतातील कोविड-१९च्या लशीशी संबंधित माहिती पाहू शकणार आहेत. हळूहळू विविध आजारांशी संबंधीत लशींची माहिती या पोर्टलवर मिळणार आहे. कोणती लस कोणत्या टप्प्यात आहे आणि त्या त्या टप्प्यातील निकाल काय आहेत, याबाबतची माहिती लोकांना या पोर्टलवर वाचता येणार आहे. ICMR ने हे पोर्टल भारतात सुरू असलेल्या लसनिर्मितीशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

कोणाला मिळणार पहिली लस?

भारतात करोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वप्रथम ती आरोग्य कर्मचारी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना देण्यात येईल असे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वारंवार सांगितलेले आहे. त्यानंतर देशातील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर स्वरुपाचे आजार झालेल्या रुग्णांना ही लस देण्यात येईल. त्यानंतर उपलब्ध डोसच्या आधारे सर्वांना ती टोचली जाईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here