पीडित १९ वर्षीय तरुणी बीए द्वितीय वर्षाला शिकते. एप्रिल २०१८मध्ये जगदीश याने तरुणीला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर दोघे चॅटिंग करायला लागले. याचदरम्यान जगदीश याने तिला फुटाळा तलाव येथे भेटायला बोलाविले. तरुणी त्याला भेटायला गेली. जगदीश याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यासोबत छायाचित्र काढले. घरी कोणी नसताना तो तरुणीच्या घरी गेला. तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने तरुणीचे अश्लील छायाचित्रही काढले. हे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तरुणीवर सतत अत्याचार करायला लागला. दरम्यान, त्याने तरुणीला तिच्या लहान बहिणीबाबतही अधिक विचारपूस करायला सुरुवात केली. तरुणीला संशय आला. तरुणीने जगदीश याने अत्याचार केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times