सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर संशयकल्लोळ निर्माण करण्यात आला होता. मुंबई पोलीस योग्य तपास करीत नाही, असा आरोप करण्यात आला होता. मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून खून आहे, अशी थिअरी मांडण्यात आली होती. ‘एम्स’नं दिलेल्या व्हिसेरा व शवविच्छेदन अहवालातून मात्र ही आत्महत्याच असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं मुंबई, मुंबई पोलीस व महापालिकेकडं बोट दाखवणारे टीकेच्या रडारवर आले आहेत.
वाचा:
महापौर किशोरी पेडणेकर यांनी या टीकाकारांवर जोरदार तोफ डागली आहे. ‘स्वत:च्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे उद्योग सुशांतसिंह प्रकरणात झाले. मुंबई पोलीस व महापालिकेविरुद्ध कारस्थान रचले गेले. ‘एम्स’च्या शवविच्छेदन अहवालामुळं हे कारस्थान उधळलं गेलं आहे. ‘आदित्य ठाकरे व शिवसेनेला बदनाम करण्याचेही षडयंत्र यामागे होते. आरोग्य यंत्रणा, पोलीस व राजकीय नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. या लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे,’ असंही पेडणेकर म्हणाल्या.
‘मुंबई प्रतिमा मलिन करणाऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. मुंबईकरांनी सोशल मीडियातून त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे,’ असंही महापौर म्हणाल्या.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times