म. टा. प्रतिनिधी, नगर: अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची तब्बल २२ कोटी ९० लाख रुपयांची केल्याप्रकरणी कर्जदार, जामीनदार व पुरवठादार एजन्सीचे संचालक अशा एकूण सात जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात काल, शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. निलेश विश्वास शेळके, डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे, डॉ. भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश ओमप्रकाश अगरवाल, निर्मल एजन्सीचे व स्पंदन मेडिकेअर, पुणे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

नगर शहरात उभारलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशिनरी खरेदी करण्यासाठी डॉक्टरांनी अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट या शाखेतून २०१४ मध्ये २२ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज घेतल्यानंतर मात्र हॉस्पिटलसाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता निर्मल एजन्सी व स्पंदन मेडिकेअर या फर्मबरोबर संगनमत करून कर्जाची रक्कम डीलरच्या खात्यातून रोहिणी सिनारे व उज्वला कवडे यांच्या वैयक्तिक खात्यात ट्रान्सफर करून घेतली व त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच ज्या कारणासाठी कर्ज घेतले होते त्याचसाठी पैशांचा वापर न करता ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, अर्बन बँकेवर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रशासकांची नियुक्ती झालेली आहे. प्रशासक यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार प्रमुख व्यवस्थापकांनी ही तक्रार पोलिसात दिली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here