उन्नाव: उत्तर प्रदेशातील येथे पोटदुखीची समस्या असलेल्या एका १८ वर्षीय युवकाचे एक्सरे पाहिल्यानंतर डॉक्टर देखील अचंबित झाले. डॉक्टरांना त्या युवकाच्या पोटात काही दिसत होत्या. चार डॉक्टरांनी सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया करून मुलाच्या पोटातून लोखंडी , ४ इंची लांबीची सळी अशा लोखंडाच्या एकूण ३६ वस्तू बाहेर काढल्या. या लर्व वस्तूंचे वजन सुमारे ३०० ग्राम इतके भरले.

उन्नावमधील भतावा गावचा रहिवाशी असलेल्या या १८ वर्षीय युवकाचे नाव करण असून त्याला गेल्या दोन महिन्यापासून पोटदुखीचा त्रास होत आहे. करणची आई कमला यांनी आपल्या मुलाला उन्नाव आणि कानपूरच्या अनेक डॉक्टरांना दाखवले मात्र त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी शुक्लागंजच्या खासगी नर्सिंग होममध्ये नेण्यात आले.

होत होता पोटदुखीचा त्रास

करण नावाच्या युवकाच्या पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन तो युवक आपल्याकडे आल्याची माहिती डॉ. संतोष वर्मा यांनी माहिती देताना सांगितले. डॉक्टरांना सीटी स्कॅन आणि एक्सरेद्वारे युवकाच्या पोटात लोखंडी वस्तू असल्याची कल्पना आली. त्यानंतर युवकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेद्वारे या युवकाच्या पोटातून एकूण ३६ लोखंडी वस्तू बाहेर काढण्यात आले. या वस्तूंमध्ये , खिळे आणि लोखंडी सळ्यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचे वजन सुमारे ३०० ग्राम इतके आहे.

हृदयापर्यंत पोहोचल्या होत्या लोखंडी वस्तू
युवकावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया कठीण होती आणि ती बराच वेळ चालली असे डॉक्टर वर्मा यांनी सांगितले. मात्र, विशेषज्ञ सर्जन डॉ. पवन सिंह, डॉ. आशीष पुरी, डॉ. राधा रमन अवस्थी आणि स्वत: डॉ. वर्मा यांनी मोठी सावधगिरी बाळगत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. काही लोखंडी वस्तू या करणच्या हृदयाच्या अगदी जवळपास होत्या. हे पाहता काहीही होऊ शकत होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या शस्त्रक्रियेच्या सफलतेनंतर डॉक्टरांना हायसे वाटले.

क्लिक करा आणि वाचा-

डॉक्टर म्हणाले, ‘या वस्तू कोणी कसे काय खाऊ शकते’
या शस्त्रक्रियेनंतर आपला मुलगा ठीक झाल्याचे आई कमला यांनी सांगितले. मात्र, या सर्व वस्तू करणच्या पोटात गेल्याच कशा, याबाबत त्यांना काहीच कल्पना नाही. खिळे, सुयांसारख्या वस्तू खाल्ल्या जाऊ शकतात, मात्र, स्क्रू ड्रायव्हर आणि सळी कशी काय खाल्ली जाऊ शकते, याचे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here