म. टा. प्रतिनिधी, : पुण्यातील नवले पुलाजवळ चार दिवसांपूर्वी मृतदेह आढळून आला होता. त्या खुनाच्या घटनेचे गूढ उलगडले आहे. अनैतिक संबंधांतून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खून करून हातपाय बांधून मृतदेह पोत्यात भरून पुलाजवळ टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
रोहिदास पाटोळे (वय ४५, रा. ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अमर क्षीरसागर (वय २२, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अमर हा पालिकेत कंत्राटी पद्धतीवर नोकरी करत होता. त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याच महिलेबरोबर आरोपी रोहिदास याचे देखील संबंध होते. त्यातून या दोघांमध्ये वाद सुरू होते. यावरून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीने रोहिदास याचा खून करून हातपाय बांधून त्याचा मृतदेह पोत्यात घालून फेकून दिला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी याचा तपास करत आरोपीला अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Looking at this article, I miss the time when I didn’t wear a mask. slotsite Hopefully this corona will end soon. My blog is a blog that mainly posts pictures of daily life before Corona and landscapes at that time. If you want to remember that time again, please visit us.