मुंबईने यावेळी हैदराबादपुढे विजयासाठी २०९ धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने चांगली सुरुवात केली. त्यावेळी मुंबईला गरज होती ती पहिल्या विकेटची. त्यावेळी मुंबईच्या संघाने ट्विटरवरून गणपती बाप्पाला साद घातली. गणपती बाप्पा मोरया, पहिली विकेट लवकर द्या, असे मुंबईने आपल्या ट्विटरवर लिहिले. त्यानंतर काही वेळातच मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मुंबईच्या संघाने बाप्पाचे ट्विटरवर आभारही मानल्याचे पाहायला मिळाले आहे.
मध्ये आज
विरुद्ध
(
) यांच्यात लढत सुरु आहे. मुंबईने चार सामन्यात दोन विजय मिळवले आहेत तर हैदराबादने देखील दोन विजय आणि दोन पराभवासह ४ गुण झाले आहेत. मुंबईचे फलंदाज आणि गोलंदाज यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे.
आयपीएलचा नवा नियम काय सांगतोआयपीएलमध्ये यावर्षी खेळाडूंच्या देवाण-घेवाणीबद्दल नवीन नियम केलेला आहे. आयपीएलच्या मध्यंतरानंतर कोणत्या संघाला दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्या संघात घेता येणार आहे. पण त्यासाठी त्या खेळाडूने संघासाठी दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेले असावेत. सध्याच्या घडीला अजिंक्य आणि गेल हे आपल्या संघांकडून एकही सामने खेळेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना चेन्नईचा संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
सध्याच्या घडीला चेन्नईला आतापर्यंत चांगली सलामी मिळालेली नाही. कारण मुरली विजय हा आतापर्यंत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी अजिंक्य हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे अजिंक्य चेन्नईच्या संघातून खेळण्याची शक्यता जास्त आहे. चेन्नईच्या संघातील परदेशी खेळाडूंचा कोटा भरलेला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ गेलपेक्षा अजिंक्यलाच आपल्या ताफ्यात सामील करण्याचा विचार करेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
When I read an article on this topic, baccarat online the first thought was profound and difficult, and I wondered if others could understand.. My site has a discussion board for articles and photos similar to this topic. Could you please visit me when you have time to discuss this topic?