भाजप आमदार यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहलं आहे. ‘सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडे ६५ दिवस होता. या कालावधीत ड्रग्स संदर्भातील गंभीर व्हॉट्सअॅप चॅट उपलब्ध असताना देखील असे कोणते कारण होते की महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले? एवढी महत्त्वाची गोष्ट सरकारने दडवून का ठेवली?,’ असा सवाल राम कदम यांनी पत्रातून केला आहे.
‘अनेक बड्या बड्या लोकांना वाचवण्यासाठी कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने मुद्दाम याकडे लक्ष दिले नाही आणि म्हणूनच ६५ दिवसांमध्ये कोणाची अटक किंवा हा ड्रग्सचा विषय समोर आला नाही, हा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने का करावा?’ असंही ते म्हणाले आहेत.
‘महाराष्ट्र सरकारच्या संशयास्पद वागण्यामुळं शौर्याची पंरपरा असलेल्या असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचं पाप महाराष्ट्र सरकारच्या हातून घडलं हे नाकारता येणार नाही. महाराष्ट्र सरकारला मुंबई पोलिसांची माफी मागत, या प्रश्नाची उत्तरे सरकारला द्यावी लागतील,’ असंही राम कदम म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times