म.टा.प्रतिनिधी, नगर: उत्तर प्रदेशातील बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशातील वाढत्या बलात्कार प्रकरणावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मुलींवर संस्कार नसल्यानं बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याचं’ सांगत सुरेंद्र सिंह यांनी मुक्ताफळं उधळलीत. सिंह यांच्या वक्तव्याचा भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा यांनी समाचार घेतानाच हाथरसच्या घटनेनंतर उत्तरप्रदेशच्या भाजप नेत्यांना नेमकं झालयं तरी काय?, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

‘उत्तरप्रदेशचे सरकार फेल ठरले असताना तेथील काही नेत्यांची संतापजनक वक्तव्य समोर येत आहे. एक नेते म्हणत आहेत की आई-वडिलांनी जर मुलींवर संस्कार केले, तर अशा घटना घडणार नाहीत. मुली शेतात काम करण्यास जातातच का, असेही तेथील नेते म्हणतात. पण मला त्या नेत्यांना सांगायचे आहे की, नेताजी हे गोरगरिब कुटुंब आहेत. जोपर्यंत येथे मुली किंवा परिवारातील लोक शेतामध्ये काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांचे पोट भरत नाही. त्यांच्या घरात कोणी नेता नाही, जो भ्रष्टाचार करून करोडो रुपये घरामध्ये आणून देईल,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

वाचाः

‘आई-वडिलांच्या संस्कारावर बोट दाखवतात?, मुलींच्या चारित्र्यावर संशय घेताय? पण एक लक्षात ठेवा, भारत हा कृषी प्रधान देश आहे. का नाही महिलांनी शेती करावी ?, असा सवालही उपस्थित करतानाच, तुमची जी मानसिकता आहे, ती बदलली पाहिजे. ही विकृती बदलली पाहिजे, असेही त्यांनी हाथरस प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना सुनावले आहे.

वाचाः

‘हाथरस घटनेत त्या मुलीचा जीव गेलाय. तरी ज्या पद्धतीने संबंधित नेते वक्तव्य करत आहेत, ती त्यांनी मागे घ्यावीत, व सर्व महिलांची माफी मागावी. अन्यथा उत्तरप्रदेशमधील महिलाच रस्त्यावर उतरून याचे उत्तर देतील, कारण आता महिलांचा अपमान कोणीही सहन करणार नाही,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केलेय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here