रोम: करोना विषाणू महासाथीच्या काळात बाजार भांडवलशाही पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे यांनी म्हटले आहे. जगासाठी आता नव्या राजकारणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. हे नवीन राजकारण संवाद आणि एकता यावर भर देणारे आणि युद्धाला नाकारणारे हवे असेही त्यांनी सांगितले.

कोविडनंतरच्या जगाबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त करताना त्यांनी आपला दृष्टीकोण मांडला आहे. यामध्ये त्यांनी सामाजिक शिक्षणाच्या मूलभूत घटकांचा, तत्वांचा समावेश केला आहे. त्यांनी आपल्या या संदेशाला ‘फ्रेटेली टुट्टी’ (Fratelli Tutti) म्हणजे सर्व भाऊ असे शीषर्क दिले आहे. या शीषर्कावरून वाद निर्माण झाला आहे. हे शीर्षक लैंगिक समानतेच्या मुल्याला नाकारत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. तर, व्हॅटिकन सिटीने हे आक्षेप फेटाळून लावले आहे. हा शब्द लैंगिक समानतेचा समावेश करणारा असून पोप यांच्या विचारपत्रात महिलांच्या मुद्यांचाही समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. पोप फ्रान्सिस हे सुधारणावादी, उदारमतवादी धर्मगुरू समजले जातात. योग्य कारणासाठी संरक्षण म्हणून युद्धाला योग्य ठरवण्याच्या सिद्धांतालाही कॅथलिक चर्चने फेटाळून लावला आहे. हा सिद्धांत अनेक शतकांपासून व्यापक रुपाने लागू केला जात आहे. मात्र, आता हा व्यवहार्य राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले. करोना महासाथीच्या आजारामुळे सध्याच्या प्रचलित राजकीय आणि आर्थिक रचनेत बदलाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी म्हटले. व्यवस्थेतील सुधारणांमुळे महासाथीच्या आजारामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या वैध गरजांनाही पूर्ण करता येऊ शकते.

वाचा:

वाचा:

करोनाच्या काळात कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी विविध चळवळी, संघटना, उपेक्षित घटकांचे ऐकायला हवे जेणेकरून योग्य सामाजिक-आर्थिक धोरण आखता येईल. पोप यांनी एकटे पाडणे, द्वेष करणाच्या राजकारणाची निंदा केली असून संवाद, एकता आणि भातृभावासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

वाचा:

पोप फ्रान्सिस यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवरही टीका केली. काही मोजक्या लोकांसाठी गरिबांना आणखी गरिब केले जात आहे. पोप यांनी वैयक्तिक खासगी संपत्तीच्या अतिरेकाचा निषेध केला असून पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती, संसाधनांचा वापर समाजाच्या, जगाच्या हितासाठी करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here