मॅपुटो: सीरियातून पळालेल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी आफ्रिकन खंडाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मोझाम्बिक या आफ्रिकन देशात आपले बस्तान बसवले असून या देशातील एका शहराला आपली राजधानी घोषित केली आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी आयएसच्या दहशतवाद्यांनी एका महत्त्वाच्या कच्च्या तेलाच्या साठ्यावर ताबा मिळवला आहे. आयएसचे वर्चस्व वाढल्यानंतर या शहरातील महिलांच्या अपहरणात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

अपहरण झालेल्या महिलांचा वापर गुलाम, सेक्स स्लेव म्हणून करण्यात येत असल्याचे म्हटले जाते. सीरियातही आयएसच्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केले होते. आयएसच्या दहशतवाद्यांनी मोझाम्बिकमध्ये आतापर्यंत १५००हून अधिकजणांच्या हत्या केल्या आहेत. त्याशिवाय आयएसच्या कारवायांमुळे २०१७ पासून आतापर्यंत जवळपास एक लाख लोक विस्थापित झाले आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात काबो डेलगाडो प्रांतातील मोसिम्बाओ दा प्राइआ शहरावर ताबा मिळवला होता. हे शहर प्रमुख बंदर असलेले शहर आहे. आयएस दहशतवाद्यांनी ही आपली नवीन राजधानी असल्याचे स्थानिकांना सांगितले आहे.

वाचा:

या भागाता कच्च्या तेलाचे मोठे साठे आहेत. त्याशिवाय घनदाट जंगलामुळे दहशतवाद्यांसाठी शस्त्रसाठा, दारूगोळ्याची तस्करी करणे सहज शक्य आहे. या भागात सैन्याची उपस्थिती जवळपास नाहीच आहे. ज्या ठिकाणी सैन्य तैनात करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी आयएसचे दहशतवादी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडत आहेत. स्थानिक लोक या दहशतवादी गटाला अल शबाब या नावाने ओळखतात. मात्र आयएसशी संबंधित असलेला गट स्वत: ला अल-सु्न्नह वा जमाअ म्हणतात.

वाचा:

‘डेली स्टार’ या वृत्तपत्राशी बोलताना विश्लेषक डेविड ओटो यांनी सांगितले की, घनदाट जंगल आणि हिंदी महासागरात पोहचण्यासाठी सर्वात सोप्पा मार्ग असल्यामुळे हा भाग दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरला आहे. दहशतवादी घनदाट जंगलात सहजपणे लपले जातात आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेत येत नाहीत.

वाचा:

मागील वर्षी आयएसच्या दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच केली होती. मोसिम्बाओ दा प्राइआ शहरावर हल्ला केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या नौदलाने त्यांच्या जोरदार प्रतिकार केला. मात्र, त्यांच्याजवळ असणारा दारूगोळा संपल्यानंतर नौदलाच्या जवानांनी पळ काढला. त्यामुळे या शहरावर आयएसचा ताबा झाला. या शहराजवळ ४५ अब्ज डॉलरच्या नैसर्गिक वायूचा एक प्रकल्प आहे.

स्थानिक दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मुकाबला करण्यासाठी सॅटेलाइट फोन, नेटवर्क कॉम्प्युटर आणि युद्धासाठी आवश्यक उपकरणे जमा केली आहेत. त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्त्रे आणि प्रशिक्षित दहशतवादी आहेत. स्थानिक पोलीस ठाणे, लष्करी ठाणी आदी ठिकाणी दहशतवादी हल्ला करतात. या ठिकाणांहूनही त्यांना शस्त्र मिळत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here