मोगा: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मोगामध्ये ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्व करण्यासाठी पंजाबमध्ये पोहोचले. या दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी देखील जाहीर सभेत उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासोबत रॅलीत सहभागी झालेले नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, ‘केंद्र सरकारने शेतकऱ्यांना किमान धारभूत किंमत देणं बंद केलं तर राज्यांनी ती दिली पाहिजे’

‘हिमाचल प्रदेश जर सफरचंद खरेदी करू शकत असेल तर आम्ही शेतकऱ्यांचं उत्पादन का खरेदी करू शकत नाही. त्यांना किमान आधारभूत किंमत देऊ शकतो का? पंजाब सरकार शेतकर्‍यांना एमएसपी देऊ शकली तर आपण स्वावलंबन होऊ’, असं सिद्धू म्हणाले.

राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहन माजी मंत्री सिद्धू यांनी केलं. २०१७ मध्ये सिद्धू यांनी भाजपला राम राम करत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

‘आपण जर या काळ्या कायद्यांविरुद्ध लढा दिला नाही तर सर्व काही अंबानी आणि अदानी यांच्याकडे जाईल. ते मोठ्या वकिलांसोबत येतील. मग त्याच्या सामना शेतकरी कसे करतील हे सांगणं कठीण आगे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उपन्न हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप सिद्धू यांनी केला.

नवीन कृषी कायद्यांविरोधता पंजाबसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची निदर्शनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पंजाबमधील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शेतीशी संबंधित तिन्ही कायदे रद्द केले जातील. किमान आधारभूत किंमत, अन्नधान्य खरेदी आणि घाऊक बाजारपेठा देशाचे तीन आधारस्तंभ म्हणून आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही व्यवस्था नष्ट करायची आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here