मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराच्या शटअप या कुणाल या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं असून आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्यात भेट झाली आहे.

काही दिवसांपूर्वी कुणालनं सोशल मीडियावर संजय राऊत यांनी त्याच्या शोमध्ये सहभागी व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. संजय राऊत सरांनी शटअप या कुणालं या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरू करेन, अन्यथा शक्यता कमी आहे, असं ट्विट कुणाल कामरानं केलं होतं.

नुकतंच संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर कुणाल कामरासोबतचा फोटो शेअर करत आज कुणाल कामराला भेटलो, असं कॅप्शन दिलं आहे. येत्या रविवारी खारमधील स्टुडिओत या मुलाखतीतं चित्रीकरण पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत आणि कुणाल कामराच्या या मुलाखतीची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

कुणाल कामरानं गेल्या काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ‘शटअप यार कुणाल’ या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कुणाल कामरा कृष्णकुंजवर गेला होता. कुणालने राज यांना एक पत्र दिलं होतं. त्यात त्यानं असं म्हटलं होतं की, मी तुमच्याबद्दल माहिती शोधली. तेव्हा तुम्हाला कीर्ती कॉलेजचा वडापाव आवडतो हे मला समजलं. त्यामुळं मी तुम्हाला लाच द्यायला वडापाव आणला आहे. जेणेकरून तुम्ही माझ्या ‘शटअप यार कुणाल’ या कार्यक्रमासाठी याल, असं कुणालनं त्याच्या पत्रात म्हटलं होतं. कुणाल यांनी निमंत्रण दिलेलं निमंत्रण राज यांनी स्विकारलं नव्हतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here