मुंबईः राज्यात करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी अजूनही करोना मृतांचा आकडा भीतीदायक आहे. आज राज्यात ३२६ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज नवीन बाधित रुग्णांची संख्या मात्र घटली आहे. त्यामुळं काही अंशी दिलासा मिळाला आहे. ()

महाराष्ट्रात काल २७८ करोना मृतांची नोंद झाली होती. त्या तुलनेत आजचा आकडा वाढला आहे. आज ३२६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांच्या संख्येनं ३८ हजार ०८४चा आकडा गाठला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २. ६४ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आज १५ हजार ०४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आत्तापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एक टक्क्यानं वाढलं असून सध्याचा रिकव्हरी रेट ७९. ६४ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ चाचण्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज महाराष्ट्रात १३ हजार ७०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं एकूण रुग्णांची संख्या १४ लाख ४३ हजार ४०९ इतकी झाली आहे. तर, राज्यातील विविध रुग्णालयांत २ लाख ५५ हजार २८१ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात २२ लाख ०९ हजार ६९६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, २७ लाख ९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here