vs , : पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या सलामीवीरांना पहिल्यांच सूर गवसलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या दोन्ही सलामीवीरांच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने पंजाबवर मोठा विजय साकारला. या सामन्यातून चेन्नईचा नाद करायचा नाही, असंच या दोन्ही सलामीवीरांनी अन्य संघाला दाखवून दिले आहे. फॅफने यावेळी ५३ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८७ धावांची खेळी साकारली, तर वॉटसनने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ८३ धावा केल्या.

पंजाबच्या १७९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने भन्नाट सुरुवात केली. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी अर्धशतके साजरी केली आणि संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये चेन्नईचा चांगली सलामी मिळालेली नव्हती. पण या सामन्यात पहिल्यांदाच चेन्नईला शतकी सलामी मिळाल्याचे पाहायला मिळाले. वॉटसन आणि फॅफ यांनी चांगली रणनिती आखत पंजाबच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबच्या संघाला चेन्नईपुढे १७९ धावांचे आव्हान ठेवता आले. राहुलने यावेळी ६३ धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर त्याला अन्य खेळाडूंचीही चांगली साथ मिळाली. चेन्नईकडून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने यावेळी एकाच षटकात राहुल आणि निकोलस पुरनला बाद करत पंजाबला दुहेरी धक्के दिले.

पंजाबच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबच्या संघाला कर्णधार लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. राहुल आणि मयांक या जोडीने यावेळी संघाला ६१ धावांची सलामी करून दिली. पण यावेळी चेन्नईचा फिरकीपटू पीयुष चावलाने मयांकला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. मयांकला यावेळी २८ धावा करता आल्या. मयांक बाद झाल्यावर राहुलला साथ देण्यासाठी मनदीप सिंग आला. मनदीप सुरुवातीला सावध खेळत असला तरी राहुल मात्र दुसऱ्या टोकाकडून दमदार फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. पण चेन्नईचा फिरकीपटू रवींद्र जडेजाने यावेळी मनदीपला बाद करत ही जोडी फोडली. मनदीपने १६ चेंडूंत २७ धावा केल्या.

मनदीप बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या निकोसल पुरनने यावेळी चेन्नईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पुरनने अखेरच्या काही षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. राहुल आणि पुरन यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळेच पंजाबच्या संघाला या सामन्यात आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पुरनने यावेळी फक्त १३ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३३ धावांची खेळी साकारली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने यावेळी पुरनला ज़डेजाकरवी झेलबाद केले. लोकेश राहुलने यावेळी संघाला चांगलेट सावरले. कारण एकाबाजूने तो चांगल्या धावा करत धावगती वाढवत होता. पण शार्दुल ठाकूरने राहुलला बाद करत चेन्नईच्या संघाला मोठे यश मिळवून दिले. राहुलने यावेळी ५२ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६३ धावांंची खेळी साकारली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here