vs , : चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आज आपला पराभवाचा दुष्काळ संपवल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी सलग तीन पराभव मिळाल्यामुळे चेन्नईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. पण आज पंजाबच्या संघावर विजय मिळवल्यावर चेन्नईने गुणतालिकेत नेमके कणते स्थान पटकावले आहे, पाहा…

यापूर्वी झालेल्या चार सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला फक्त एकच विजय मिळवता आला होता. त्याचबरोबर चारपैकी तीन सामने सलग गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पण आजच्या सामन्यात मात्र चेन्नईच्या संघाने मोठा विजय मिळवला. त्यामुळे गुणतालिकेतही याचा परीणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी चेन्नईचा संघ गुणतालिकेत तळाला होता. पण या विजयानंतर चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

या सामन्यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ सातव्या स्थानावर होता. कारण चार सामन्यांमध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला होता, तर तीन पराभव त्यांच्या पदरी पडले होते. त्यामुळे ते सातव्या स्थानावर होते. पण चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर त्यांना गुणतालिकेतील अखेरचे स्थान मिळाले आहे. या पराभवानंतर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईकडून पराभव पत्करल्यावर हैदराबादचा संघ सहाव्या स्थानावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे. हैदराबादच्या संघाचे चार गुण असेल तरी त्यांना रनरेट हा कमी असल्यामुळे त्यांची सहाव्या स्थानावर घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला गुणतालिकेत मुंबईचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आणि तिसऱ्या स्थानावर आरसीबीचा संघ आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे केकेआर आणि राजस्थान रॉयल्स हे संघ असल्याचे पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here