नवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्काराच्या ( ) घटनेवरून राजकारण तापलं आहे. हाथरसला जाऊन वेगवेगळ्या पक्षांचे नेते पीडित कुटुंबाला भेटत आहेत. पीडित कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच युपीतील ( ) यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेबाबत विरोधी पक्ष आक्रमक आहे.

युपीतील योगी सरकार चौफेर टीका होतेय. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘विरोधी पक्षांचा देशात आणि राज्यात जातीय दंगली घडवण्याचा कट रचत आहेत. होत असलेला विकास त्यांना पचत नाहीए. आणि दंगली घडल्यास विकास थांबेल. दंगली घडवण्याच्या प्रयत्नात राजकारण असल्याचा आरोप गंभीर आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

विरोधकांचा दंगली घडवण्याचा कट उधळून लावू आणि विकासाला गती आणखी गती देऊ, असं मुख्यमंत्री योगी म्हणाले. हाथरसमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणावरून विरोधी पक्ष युपी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लखनऊ ते दिल्लीपर्यंत युपी सरकारविरोधात निदर्शने केली.

राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी हे रविवारी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी हाथरसला गेले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रीत करण्यासाठी लाठीमार केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीसाठी यापूर्वीच एसआयटीची स्थापना केली आहे. आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे ( CBI ) देण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here