रायपूरः छत्तीसगडचे मंत्री आणि कॉंग्रेस नेते यांनी राज्यातील बलरामपूर जिल्ह्यातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बलरामपूरमधील बलात्काराच्या घटनेची हाथरस प्रकरणाशी तुलना करणं योग्य नाही. हाथरस घटनेच्या तुलनेत बलरामपूरमधील बलात्कार ही ‘किरकोळ घटना’ आहे, असं वक्तव्य डहरिया यांनी केलं. या वक्तव्यावरून भाजपने डहरिया आणि कॉंग्रेसवर हल्लाबोल केला होता. यावर दहरिया यांनी उत्तर देत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असं म्हटलंय. ‘छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना माहिती नाहीए. बलात्काराची जी मोठी घटना घडलीए ती उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील आहे. छत्तीसगडच्या बलरामपुरात तेवढी मोठी घटना घडलेली नाही’, असं ते म्हणाले.

‘बलरामपूरमधील घटना ही हाथरससारखी नाहीए. हाथरसमध्ये (युपी) एवढी मोठी घटना होऊनही रमण सिंह यांनी ट्विट का केलं नाही? रमणसिंह गप्प का आहेत? हाथरसमध्ये जे घडलं ते योग्य आहे का? यावर त्यांनी उत्तर दिलं नाही. यासाठी ट्विट का करत नाहीत. आणि छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये एक छोटी घटना घडली, त्यावर ते बोलत आहेत. ते फक्त छत्तीसगड सरकारवर टीका करण्याचं काम करत आहेत. याशिवाय दुसरं काही काम नाहीए त्यांना’, असं नगरविकास मंत्री दहरिया हे शनिवारी पत्रकारांना म्हणाले होते.

रमणसिंह यांच्या ट्विटवर देत होते उत्तर

बलरामपूरमधील घटनेवर रमणसिंह यांनी केलेल्या ट्विटविषयी विचारलेल्या प्रश्नावर शिवकुमार हे उत्तर देत होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि बलरामपूर बलात्काराची घटना किरकोळ घटना असल्याचं आपण म्हटलो नाही, असं म्हणत त्यांनी सावरासावर केली. “छोट्या आणि मोठ्या घटनांबाबत आपल्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला. हाथरसमधील कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर घडलेल्या घटनांचा उल्लेख करत होतो. हाथरस घटनेत उत्तर प्रदेश सरकारने पीडित मुलीला दिले योग्य उपचार दिले नाहीत. ज्या प्रकारे हाथरस घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि रातोरात पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले ते अमानुष आणि क्रूर आहे. त्याउलट बलरामपूर (छत्तीसगड) मधील पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आणि राज्य सरकारनेही त्वरित हालचाली केल्या, असं ते म्हणाले.
मंत्र्यांनी व्हिडिओ जारी करून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.

छत्तीसगडच्या मंत्र्यांवर भाजपची टीका

छत्तीसगडमधील काँग्रेसची विकृत मानसिकता समोर आली आहे. छत्तीसगडमधील मुलींसोबत ज्या क्रूर घटना घडत आहेत त्या त्यांना छोट्या वाटत आहेत. छत्तीसगडमध्ये महिलांवर होत असल्याच्या अत्याचाराच्या घटना राहुल गांधींनाही छोट्या वाटत आहेत का? अशा वाईट मनोवृत्तीच्या मंत्र्यांना कधी हटवर आज की उद्या? कधी होणार न्या? डहरिया यांनी या प्रकरणी माफी मागावी, असं भाजपचे उपाध्यक्ष रमण सिंह यांनी ट्विट केलंय. बलरामपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचं राज्य सरकारने दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रमण सिंह यांनी या आधी केला होता. २७ सप्टेंबरला घडलेल्या या घटनेसंदर्भात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here