दलित महासंघ व अन्याय निर्मूलन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हाथरसमधील घटनेने दलितांवरील अत्याचार आजही होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दलित मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हत्या करणा-या आरोपींमागे उत्तरप्रदेश सरकार आणि प्रशसन आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर पोलिस दबाव टाकत आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे कोणतीही भूमिका मांडली नाही. पीडित मुलीला, तिच्या कुटुंबीयांना लवकर न्याय मिळावा यासाठी खटला तीन महिन्यात फास्ट ट्रॉक कोर्टात चालवून आरोपींना शिक्षा देण्यात यावी. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनाही सहआरोपी करावे, पोलिस अधिकाऱ्यांवर विनयभंग, अपहरणाचे गुन्हे दाखल करावेत.
आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांकडून प्रतिकात्मक पुतळे काढून घेतले. पोलिसांकडून बळाचा वापर झाल्याने काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलनात जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते, अन्याय निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष धर्मेंद्र कोळी, महेश देवकुळे, गणेश भोसले, अरुण चव्हाण, वनिता कांबळे, सुशांत काळे, आदी उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times