म. टा. वृत्तसेवा, वसई
नालासोपाऱ्यामध्ये १९ वर्षीय तरुणीने केल्याची घटना शुक्रवारी घडली. ती राहत असलेल्या परिसरातील मुलांकडून आणि पोलिसांकडून तिचा मानसिक छळ केल्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. यासाठी तुळींज पोलिस ठाण्यात सुनीलविरोधात १५ सप्टेंबर रोजी तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपास करताना अधिकाऱ्यांकडून असभ्य वर्तन आणि जबाब पुरुष पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता. त्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळून शुक्रवारी रात्री ८ वाजता या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला. तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना समजावल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत रविवारी रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करावे, यासाठी रविवारी तुळींज पोलिस ठाण्यासमोर कुटुंबीयांकडून निदर्शने करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना वसईचे अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले की, या तरुणीच्या तक्रारीवरून तुळींज पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल करण्याच्या काही दिवसाआधी हे दोघेही फरार झाल्याची घटना घडली. त्यानंतर तुळींज पोलिसांनी या दोघांनाही शोधून मुलीला नातेवाईकांच्या स्वाधीन केले. तसेच मुलीचे आणि सुनीलचे असलेले प्रेमसंबंध कुटुंबीयांना मान्य नव्हते. तरीही तिला सुनीलशीच लग्न करायचे होते, असे मुलीने चिठ्ठीत लिहिले. माझ्या या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचे या मुलीने या पत्रामध्ये लिहिल्याचे सागर यांनी सांगितले. तरीही तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाची दखल घेत या प्रकारचा तपास सुरू करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here