मुंबई: विमानात प्रवासादरम्यान अल्पवयीन केल्याप्रकरणी व्यावसायिक विकास सचदेवा याला मुंबईतील विशेष न्यायालयानं आज, बुधवारी दोषी ठरवलं. डिसेंबर २०१७ मध्ये अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मुंबईतील विशेष न्यायालयानं पवईतील ४१ वर्षीय व्यावसायिक विकास सचदेवा याला पॉक्सो कायद्याच्या कलम ८ आणि कलम ३५४ अंतर्गत दोषी ठरवलं आहे. अभिनेत्रीचा विमानात प्रवासादरम्यान विनयभंग केल्याप्रकरणी सचदेवा याला पोलिसांनी अटक केली होती. ९ डिसेंबर २०१७ रोजी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

डिसेंबर २०१७ रोजी विमानात प्रवासादरम्यान अभिनेत्रीसोबत हा प्रकार घडला होता. विमानातील या छेडछाडीच्या घटनेचा व्हिडिओ तिनं इंस्टाग्रामवर शेअर केला होता. दिल्लीहून ती विमानानं मुंबईला येत होती. तिच्यासोबत आईसुद्धा होती. बिझनेस क्लासचं तिकीट तिनं काढलं होतं. ती वन एफ सीटवर बसली होती. तिच्या बाजूला आईही होती. तिच्या मागच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर थोड्या वेळानं मागे बसलेल्या प्रवाशाचा या अभिनेत्रीच्या पाठिला स्पर्श झाला. त्याबाबत त्याला सांगितलं. पण त्यानं दुर्लक्ष केलं. हा प्रकार सुरूच राहिल्यानं ती किंचाळली. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्याचा तिनं प्रयत्न केला. पण विमानातील अधूक प्रकाशामुळं ते शक्य झालं नाही. तिनं इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि घडलेला प्रकार सांगितला. त्याची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आणि सचदेवा याच्याविरोधात पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही केली होती.

सचदेवा यानं या प्रकरणी विशेष न्यायालयानं स्पष्टीकरण दिलं होतं. विमानातील बिझनेस क्लासमधून प्रवास करत होतो. दिल्लीत नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईत परतत होतो. विमानात बसल्यानंतरच झोपी गेलो होतो. मध्यरात्री घरी पोहोचल्यानंतर या घटनेबाबत समजलं. दुसऱ्या दिवशी मी घराबाहेर गेलो होतो. घरी परतल्यानंतर पोलीस घरी आल्याचं पत्नीनं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. घटनेबाबत सांगून गुन्हा दाखल केला आणि अटक केली, असं स्पष्टीकरणही सचदेवा यानं दिलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here