मुंबई: ‘मृत्यूनंतर एखाद्याचे धिंडवडे निघू नयेत म्हणून सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी नैतिकता व गुप्तता दाखवली. सीबीआयने मुंबईत येऊन तपास सुरू करताच सुशांतचे ‘गांजा’, ‘चरस’ प्रकरण बाहेर काढले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र समोर आले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. त्यासाठी बिहारने व सुशांतच्या कुटुंबाने मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत,’ असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

‘एम्स’च्या अहवालातून सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्याच केल्याचं समोर आलं आहे. या अहवालामुळं सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करणारे टीकेच्या रडारवर आले आहेत. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या साऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ‘सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य बाहेर आले आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता; पण शंभर दिवसांनंतरही शेवटी हाती काय लागले? मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱ्यांनी व गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे,’ अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

वाचा:

‘सुशांतच्या मृत्यूचा अहवाल देणाऱ्या ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचार घेऊन बरे झाले आहेत. ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे. आता ‘एम्स’चा हा अहवाल अंध भक्त नाकारणार आहेत काय?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले. सुशांतचा तपास करू शकत नाहीत म्हणून सीबीआयला बोलवा असे किंचाळणाऱ्यांनी मागच्या ४०-५० दिवसांत सीबीआय काय करतेय? हा साधा प्रश्न विचारला नाही, याकडंही शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here