व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास काही वेळेसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वॉल्टर रीड रुग्णालयातून बाहेर आले. आपल्या कारमध्ये बसून त्यांनी समर्थकांना अभिवादन केले. समर्थकांना अभिवादन केल्यानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालयात परतले. त्याआधी ट्रम्प यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपण समर्थकांना भेटणार असल्याचे संकेत दिले होते. ट्रम्प यांनी म्हटले की, मी कोविड-१९ बद्दल बरेच काही शिकलो असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा दाखवण्यासाठी ट्रम्प हे रुग्णालया बाहेर आले असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांच्या या डावामुळे विरोधी पक्ष असलेला डेमोक्रेट पक्षही हैराण झाला आहे.
वाचा:
वाचा:
ट्रम्प यांच्यावर डॉक्टर नाराज
ट्रम्प यांनी अचानकपणे रुग्णालयाबाहेर येणे चुकीचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. महासाथीचा आजार झालेले डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे डॉक्टर जेम्स फिलीप यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांसाठी असलेली एसयुव्ही कार ही फक्त बुलेटप्रूफ नाही. तर, केमिकल हल्ल्याचा परिणाम होऊ नये यासाठीही सील केलेली आहे. त्यामुळे या कारमध्ये कोविड-१९ संसर्गाचा अधिक धोका आहे. ट्रम्प यांनी रुग्णालयाबाहेर येणे हे बेजबाबदारपणा असल्याचीही टीका त्यांनी केली.
वाचा:
वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ट्रम्प यांना व्हाइट हाउसमधून रुग्णालयात दाखल करताना त्यांच्यासाठी ४८ तास महत्त्वाचे असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, रुग्णालयात ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एक व्हिडिओ संदेश जारी करत ट्रम्प यांनी आपण लवकरच निवडणूक प्रचारात येणार असल्याचे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनादेखील करोनाची बाधा झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times