म. टा. वृत्तसेवा, निफाड: गेल्या तीन महिन्यांपासून कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या येथील शासकीय सेवेतील डॉक्टर दाम्पत्याला घराजवळ राहणाऱ्या बापलेकाने हल्ला केला. तसेच सुपारी देवून ठार मारू, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २) रोजी रात्री दहा वाजेदरम्यान घडली. याबाबत संबंधित डॉक्टरने शनिवारी निफाड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

डॉ. संकेत आहेर हे आपल्या निवृत्त शिक्षक आईवडीलांसह जनार्दन स्वामी नगर येथे राहतात. त्यांची पत्नी व ते शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्यासमोर राहणारे संशयित आरोपी महेश पाटकर व अंशुमन पाटकर या दोघांनी डॉ संकेत आहेर यांच्याशी वाद घातला. डॉ. आहेर समजावून सांगत असताना त्यांना विजय व अंशुमन पाटकर यांनी खाली पाडून लाथाबुक्क्यानी मारहाण केली. यावेळी त्यांची डॉ. आहेर यांची पत्नीमध्ये आली असता त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच तुमची सुपारी देऊन कायमचा काटा काढतो, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संशयित आरोपी विजय व अंशुमन पाटकर हे परप्रांतीय असून, निफाड येथे प्लांबिगची कामे करतात. यापूर्वीही संशयित आरोपी यांनी डॉ. आहेर यांना धमकावले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here