वसई पश्चिम, देवतलाव येथील लाकडाच्या वखारीमधे मजुरी करून तेथीलच एका खोलीत काही वर्षांपासून मुकेश (२५ ) नावाचा तरुण वास्तव्यास होता. मुकेश हा मूळचा उत्तर प्रदेश येथील असून त्याची वसईतील एका २२ वर्षीय गतिमंद मुलीशी ओळख झाली होती. तिचा मोबाइल क्रमांक त्याने घेतला. त्याद्वारे तिच्याशी ओळख वाढवून त्याने जवळीक वाढवली. एवढेच नव्हे, तर तिला वारंवार भेटण्यास बोलवत होता. जबरदस्तीने दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध ठेवले. अचानक मुलीच्या पोटात दुखल्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी केली असता ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत वसई पोलिस ठाण्यात मुकेशविरोधात बलात्काराचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुकेशला तत्काळ अटक केल्याचे वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times