मुंबई: सुशांतसिंह राजपूतनं आत्महत्या केल्याचं ‘एम्स’च्या अहवालातून स्पष्ट झाल्यानं कमालीची आक्रमक झाली आहे. या प्रकरणावरून ठाकरे सरकार, मुंबई पोलिसांवर आरोप करणारी अभिनेत्री हिच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सुशांतच्या मृत्यूचे भांडवल करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा देणाऱ्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत,’ असा कडवट सवाल शिवसेनेनं केला आहे.

सुशांत प्रकरणाचे राजकीय भांडवल करणाऱ्यांवर शिवसेनेनं ”च्या अग्रलेखातून हल्ला चढवला आहे. शिवसेनेचा मुख्य रोख कंगनावर आहे. ‘हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून तिला मारले गेले. तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

वाचा:

‘ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमानांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये,’ असा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

वाचा:

‘सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली गेली. स्वत:ला पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

मुंबई पोलिसांचं कौतुक

‘मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि ‘एम्स’च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला. रिया चक्रवर्तीने सुशांतला विष देऊन मारले हा ‘बनाव’सुद्धा चालला नाही, पण सुशांत ‘ड्रग्ज’ घेत होता व त्याला ते मिळवून दिले म्हणून अखेर त्या रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले. सुशांतवर मृत्यूनंतर हाच खटला चालवण्याची कायदेशीर व्यवस्था असती तर ‘ड्रग्ज’ प्रकरणात सुशांतवर अमली पदार्थ सेवनाचा खटला चालला असता,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here