शहरात घर नव्हते, उभं आयुष्य गावातच राहिले
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष यांनी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आपण मुलायमसिंह यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. मुलायमसिंह यादव यांनी नेहमीच शेतकरी, गरीब आणि असहाय लोकांसाठी आपला आवाज उठवला. त्यांचे शहरात कोणतेही घर नव्हते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गावात अगदी साधेपणाने घालवले, असे अखिलेश यादव म्हणाले.
पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान- अखिलेश यादव
मुलायमसिंह यादव हे आयुष्यभर समाजवादी विचारधारेप्रती समर्पित राहिले. त्यांच्या निधनाने पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मुलामसिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी मुलायमसिंह आजारी होते. कानपूरमधील एका रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गावात शोक पसरला. मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरापुढे कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times