शैलेश दत्तात्रय घाडगे (वय – ३३, रा. चौधरी वस्ती, शांतीनगर, ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भाऊ निलेश दत्तात्रय घाडगे याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश घाडगे याचे जुलै २०१६ रोजी राजू अस्वले, सुमित वाकडे आणि सुमित खेडकर यांच्यासोबत भांडणे झाली होती. पोलिसांनी अस्वले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तीन महिन्यांपूर्वी अस्वले याने शैलेशच्या भावाला मोबाइलवरून शिवीगाळ केली होती. त्यामुळे शैलेश हा चिडलेला होता. रविवारी शैलेश हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेला होता. शैलेश मोटरसायकलवरून निघून गेला आणि राजू अस्वलेला मारण्यासाठी त्याचा शोध घेऊ लागला. या दरम्यान खराडीतील एका हॉटेलच्या बाजूला तिघांनी शैलेश घाडगे याला बांबूने बेदम मारहाण केली. पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून त्याचा ठेचून खून केला. सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times