मुंबई: मुंबई महापालिकेतील स्थायी व शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं ऐनवेळी माघार घेत शिवसेनेची मार्ग सुकर केल्यानं संतापला आहे. ‘काँग्रेसनं शिवसेनेसमोर नांगी टाकली,’ अशी टीका भाजपनं केली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीसाठी सुरुवातीला , व भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी अर्ज भरले होते. तिरंगी लढत असल्यामुळं शिवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपनं आखली होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसनं माघार घेतली. त्यामुळं दोन्ही समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सहज निवडून आले. काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे.

वाचा:

‘काँग्रेस हा शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्ष आहे. त्यामुळं या निवडणुकीत काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेतले. या सगळ्यासाठी कोणत्या अर्थपूर्ण तडजोडी झाल्या याचं उत्तर काँग्रेसनं मुंबईकरांना द्यायला हवं. मुंबई महापालिकेतील खरा विरोधी पक्ष कोण आहे हे आता स्पष्ट झालंय,’ असं भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले. ‘मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराविरोधात विरोधी पक्ष म्हणून अत्यंत प्रभावीपणे आवाज उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही,’ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here