जळगाव: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी सकाळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री यांना दोरखंडात जखडलेली प्रतिकात्मक संत मीराबाई यांची मूर्ती स्पीड पोष्टाद्वारे पाठविण्यात आली. सध्या देशातील महिलांची अशीच अवस्था झाली असून त्यांचे दोरखंड सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी यावेळी केली.

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील एका तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा सोमवारी सकाळी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला.

वाचा:

युवती अध्यक्ष कल्पिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करून हाथरस येथिल घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी पोष्टा कार्यालयाच्या बाहेर कल्पिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिव्या भोसले, मंगला पाटील प्रतिभा शिरसाठ यांनी संत मीराबाई यांची दोरखंडाने जखडलेली मूर्ती आणून तीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना स्पीड पोष्टाद्वारे पाठविण्यात आली. देशात महिलांची स्थिती मूर्तीप्रमाणे झाली आहे. दोरखंडानी तीला जखडून टाकण्यात आले आहे. त्यांची सुटका करण्यासाठी केंद्रीय गृहमहत्र्यांनी उपाययोजना कराव्यात यासाठीच ही प्रतिकात्मक मूर्ती पाठवीत असल्याचे कल्पिता पाटील यांनी सांगितले.

वाचा:

हाथरस घटनेबद्दल कल्पिता पाटील यांनी संताप व्यक्त करीत यातील दोषींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा दिल्लीपर्यंत धडक मोर्चा आणण्याचा इशारा देखील पाटील यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here