मिळालेल्या माहितीनुसार, विजय सिंह (वय ४०) असे मृताचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी त्यांची सहा वर्षाची मुलगी तिथे होती. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या चहाच्या स्टॉलवरील व्यक्तीला तिने घडलेला प्रकार सांगितला. माझे वडील जखमी अवस्थेत पडलेले आहेत, असे तिने स्टॉल चालकाला सांगितले. त्याने सिंह याला पाहिले. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता. त्याने तातडीने याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सिंह याला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. घटनास्थळावरून पेव्हर ब्लॉक आणि रक्ताचे नमुने घेतले आहेत, अशी माहिती वांद्रे पोलिसांकडून देण्यात आली. त्याच्या सहा वर्षांच्या मुलीसमोरच ही घटना घडली. तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली. स्कायवॉकवर पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. त्याने पत्नीला मारहाण केली. तिने रागाने त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला. दरम्यान, मारहाणीत पत्नीही जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times