दुबई, , :आजचा सामना हा सर्वांसाठी महत्वाचा असेल. कारण आजच्या सामन्यात अव्वल स्थानासाठीची लढत पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी हे दोन्ही आज मैदानात उतरतील ते विजयासह गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावण्यासाठीच. कारण सध्याच्या घडीला दोन्ही संघांचे समान सहा गुण आहेत. त्यामुळे हा सामना जिंकल्यास आठ गुणांसह त्यांना अव्वल स्थानावर पोहोचता येऊ शकते.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला सध्या चांगला सूर सापडलेला दिसत आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यात इतिहास रचण्याचीही संधी आहे. त्यामुळे कोहलीसाठी हा सामना महत्वाचा असेल. त्याचबरोबर आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलही चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहलची जादू अजूनही कायम आहे, त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीही चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

दुसरीकडे दिल्लीच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगलीच समतोल असल्याचे दिसत आहे. कारण आता पृथ्वी साव आणि शिखर धवन यांना सूर गवसलेला आहे. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यरही चांगल्या फॉर्मात आहे. गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा, आर. अश्विन आणि अॅनरीच नॉर्टजे यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. पण दिल्लीच्या संघाकडून अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाने तीन लढतींमध्ये विजय मिळवला आहे, तर एक पराभव त्यांच्या पदरी पडलेला आहे. चेन्नई, केकेआर, पंजाब या संघाना दिल्लीने पराभूत केले आहे, तर हैदराबादकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आज जर दिल्लीच्या संघाने आरसीबीला धक्का दिला तर त्यांना अव्वल स्थानावर पोहोचता येऊ शकते.

सध्याच्या घडीला आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. आरसीबीला हैदराबाद, मुंबई आणि राजस्थान या संघांवर विजय मिळवता आला आहे, तर पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे हा सामना आरसीबीसाठी महत्वाचा असेल. कारण हा सामना जिंकल्यावर त्यांना अव्वल स्थान पटकावता येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here