नगर: प्रदीर्घ काळानंतर हॉटेल, मध्ये बसून खानपान करण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळीच हॉटेलचे दरवाजे उघडले खरे, मात्र ग्राहकच येत नसल्याचा अनुभव बहुतांश चालकांना येत आहे. अद्यापही ग्राहक पार्सल घेऊन जाण्यावरच भर देत असल्याचे सांगण्यात आले. ( Maharashtra Latest Updates )

वाचा:

राज्य सरकारने पाच ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वेही घालून दिली आहेत. गेल्या काही काळापासून हॉटलमधून पार्सलसेवा सुरू झाली होती. त्यामुळे किचन सुरू होतेच. आज सकाळी नियमानुसार बैठक व्यवस्था करून हॉटेलचालकांनी तयारी केली. मात्र, अद्याप ग्राहक येण्यास तयार नसल्याचे आढळून आले.

वाचा:

हॉटेलचालक धनेश बोगावत यांनी सांगितले की, ग्राहकांच्या मनात सुरक्षेचे वातावरण तयार होण्यास आणखी काही अवधी लागेल. आम्ही तयारी केली आहे. त्यासाठीचा खर्चही वाढत आहे. गावाला गेलेले सर्वच कर्मचारी अद्याप परतलेले नाहीत. तरीही उपलब्ध यंत्रणेच्या आधारे आम्ही काम सुरू केले आहे. आता ग्राहकांची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे बार आणि नॉन व्हेजकडे ग्राहकांचा कल असला तरी व्हेज हॉटेलांना अद्याप ग्राहकांची प्रतीक्षा असल्याचे निरीक्षणही बोगावत यांनी नोंदविले.

वाचा:

संसर्गाच्या काळात लोकांच्या सवयी बदलल्या आहेत. प्रतिकारशक्ती वाढते म्हणून नॉनव्हेजकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येते. सुरू असल्याच्या काळातही हाच अनुभव येत होता. भाज्यांचे वाढलेले भाव, नोकरांना द्यावा लागणारा जास्तीचा पगार, करोनासंबंधी घ्यायच्या विविध दक्षता यामुळे हॉटेलचालकांचा खर्च वाढणार आहे. यामुळे लोकांना हॉटेलमध्ये खानपानासाठी पहिल्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. आता लगेच भाववाढ झालेली नसली तरी नजीकच्या भविष्यात ती केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच सध्याची मागणी विचारात घेता पौष्टीक, प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या भाज्यांच्या आणि खाद्यांच्या डीशही सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे.

करोनासंबंधी आता दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. दररोज आकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता दक्षता घेण्याचीही लोकांना सवय झाल्याने बाहेर जाण्यापेक्षा घरीच खाण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here