गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्यामुळं चिंता वाढली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. आज १२ हजार ९८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ११ लाख ६२ हजार ५८५ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के झाले आहे.
आज १० हजार २४४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या १४ लाख ५३ हजार ६५३ इतकी झाली आहे. राज्यात सध्या २६३ करोना रुग्णांना करोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण मृत्यूदर २.६४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१ लाख ६९ हजार ८८७ चाचण्यांपैकी १४ लाख ५३ हजार ६५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख १६० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २६ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times