लखनऊः हाथरसमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणावरून ( ) न्यायासाठी राजकारण रंगलं असताना आता यासाठी जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: विरोधकांवर जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याचा आरोप केला. आता हाथरसमधील कथित बलात्काराच्या घटनेविरोधात हिंसक निदर्शनं तयारी सुरू होती, असा दावा युपीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यासाठी https://justiceforhathrasvictim.carrd.co/ या वेबसाइटचा उपयोग होत होता, असा दावा त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. सर्वकाही आता सांगणं योग्य नाही. या प्रकरणी माहिती गोळा केली जात आहे. यानंतर यासंदर्भात माहिती देण्यात येईल, असं प्रशांत कुमार म्हणाले. जस्टिस फॉर हाथरस व्हिक्टिम या वेबसाइटच्या संदर्भात प्रशांत कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी ही वेबसाइट तयार करण्यात आल्याचा दावा करत युपी सरकारने केला. बनावट आयडीच्या माध्यमातून अनेक जण या वेबसाइटशी जोडले गेल्याचा दावाही सरकारने केला होता. या साइटवर दंगली भडकवण्यापासून ते कायदेशीर उपाययोजना करण्याची माहितीही देण्यात आली आहे, असं सरकारने म्हटलंय.

सोशल मीडियावर चुकीचे फोटो पोस्ट करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यासाठी निधीही दिला जात आहे. जगभरात विविध आंदोलनांसाठी Carrd.co नावाचं लँडिंग पेज तयार केलं जातंय. तसचं पेज या प्रकरणासाठी तयार गेलं होतं. हे पेज आता डिलिट करण्यात आलं आहे. या वेबसाइटच्या मागे, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA) हिंसक आंदोलन करणाऱ्या पीएफआय आणि एसडीपीआय या संघटनांचा हात असल्याचा संशय देखील आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here