मुंबईः मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) द्वारे आज १.१० कि.मी. चा भुयारीकरणाचा ३२वा टप्पा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनं पूर्ण करण्यात आला. हे भुयारीकरण सिद्धिविनायक उत्तर शाफ्ट ते दादर मेट्रो स्थानक इतके आहे.

‘नागरिकांना कामामुळे होणारा त्रास कसा कमी होईल याचा विचार करून हे महत्वपूर्ण आणि अवघड काम पूर्ण करणं कौतुकास्पद आहे. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये सकारात्मक बदल होणार हा मुंबईकरांसाठी दिलासा मिळणार आहे,’ अशी आशा राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांनी व्यक्त केली आहे.

‘दादर मेट्रो स्थानक हे रहिवासी इमारती आणि व्यापारी कार्यालये यांच्यामध्ये बांधण्यात आले असून मुंबई मेट्रो ३च्या स्थानकांपैकी एक महत्वाचे स्थानक आहे. त्यामुळे आजचा भुयारीकरणाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करणं हे आव्हानात्मक होते.’ असं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजित सिंह देओल यांनी म्हटलं आहे.

कृष्णा २ हे हेरेननेच बनावटीचे आणि भूगर्भदाब नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश असलेले टनेल बोअरिंग मशीन १६ डिसेंबर २०१९ रोजी भूगर्भात सोडण्यात आले होते. या मशीनने आज २९५ दिवसात ७९१ रिंगच्या सहाय्याने अप-लाईन भुयारीकरण पूर्ण केले.

पॅकेज- ४ मध्ये दादर सिद्धिविनायक आणि शितलादेवी या स्थानकांचा समावेश असून दादर स्थानकाचे ६१% काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण ९४ % भुयारीकरण आणि ९५ % खोदकाम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्पाचा विचार करता ८७ % भुयारीकरण आणि ६० % बांधकाम पूर्ण झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here