दुबई, , : दिल्लीच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. मार्कस स्टॉइनिसने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतकही पूर्ण केले. फलंदाजांच्या जोरदार फटेकेबाजीच्या जोरावर दिल्लीच्या संघाला आरसीबीपुढे १९७ धावांचे आव्हान ठेवता आले.

आरसीबीने नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा फायदा दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी चांगली उचलला. पृथ्वी साव आणि शिखर धवन यांनी यावेळी ६२ धावांची सलामी संघाला दिली. आता ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार, असे वाटत होते. पण पृथ्वीला यावेळी संघात आलेल्या मोहम्मद सिराजने बाद केले. पृथ्वीने यावेळी २३ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ४२ धावांची खेळी साकारली.

पृथ्वी बाद झाल्यावर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर ही जोडी मैदानात होती. पण या दोघांनाही त्यानंतर मोठी खेळी साकारता आली नाही. धवनला यावेळी वेगवान गोलंदाज इसुरु उडानाने बाद केले, त्याला २८ चेंडूंत ३२ धावा करता आल्या, धवननंतर काही वेळातच श्रेयसही बाद झाला. आरसीबीच्या संघातील अष्टपैलू मोईन अलीने यावेळी श्रेयसला देवदत्त पडीक्कलकरवी झेलबाद केले. श्रेयसला यावेळी १३ चेंडूंत ११ धावा करता आल्या.

श्रेयस बाद झाल्यावर दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत हा मैदानात होता. रिषभला यावेळी मार्कस स्टॉइनिस साथ देत होता. पण सुरुवातीला स्टॉइनिस हा पंतपेक्षा जलदगतीने धावा जमवत असल्याचे पाहायला मिळाले. पंत आणि स्टॉइनिस यांनी यावेळी अर्धशतकी भागीदारीही रचली. पंतने यावेळी २५ चेंडूंत ३७ धावांची खेळी साकारली. पण स्टॉइनिसने मात्र धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here