वाचा:
सेवली भागात विलास आठवले यांची जमीन आहे. या जमिनीवर काही लोकांनी कब्जा केल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. महसूल आणि प्रशासनाकडे तक्रारी करूनही या संदर्भात कारवाई होत नसल्यानं पालकमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यासाठी आठवले हे जिल्हाधिकारी कार्यालयात आज आले होते. मात्र त्यांना पालकमंत्र्यापर्यंत जाऊ दिले नाही. त्यामुळे आठवले यांनी टोकाचा निर्णय घेतला.
वाचा:
राजेश टोपे यांची आढावा बैठक सुरू असतानाच विलास आठवले यांनी विषाची बाटली तोंडात घालून विष सेवन करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तातडीने त्यांना पकडले व त्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. विलास आठवले यांना उपचारासाठी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत बोलण्यास राजेश टोपे यांनी नकार दिला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times