मुंबई: कोविड रुग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. हे इंजेक्शन बरंच उपयुक्तही ठरत आहे. त्यातूनच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला असून त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार गरजूंना हे औषध सहज उपलब्ध व्हावे, यासाठी काटेकोरपणे दक्षता बाळगण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ( Latest Updates )

वाचा:

सध्या महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जात असल्याचेही मंत्री यांनी स्पष्ट केले आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवले जात आहे. सदर औषधाचे वितरण फक्त रुग्णालय व संस्था यांनाच करण्यासाठी अनुमती दिलेली आहे, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. आजतागायत प्रशासनामार्फत काही ठिकाणी छापे टाकून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे. त्यात आरोपींना पोलिसांमार्फत अटकही करण्यात आलेली आहे, अशी माहिती देतानाच सह-आयुक्त जे. बी. मंत्री यांनी महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.

वाचा:

२४ तास नियंत्रण कक्ष

प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा क्रमांक ०२२-२६५९२३६४ असा आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ हा उपलब्ध आहे. रेमडेसिविर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधून दिल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाईल तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त मंत्री यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here