राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. बाबाखोरी परिसरात पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील अधिकारी शहीद झाले.
भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी आज, सोमवारीच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर हल्ला केला, त्यानंतर काही तासांनी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पुलवामा जिल्ह्यातील पंपोर येथील कंडाल परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन झाले होते. तर तीन जवान जखमी झाले. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढलेल्या आहेत. ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील दोन अधिकारी शहीद झाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times