वाचा:
मार्गावर १२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत असल्याचे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला अनुसरून रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असल्याने राज्यात आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी आणखी काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट काही अटींवर सुरू करण्यास परवानगी देतानाच राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. त्यात पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलसेवा मुंबई महानगर प्रदेशात धावत असलेल्या लोकलसाठी जे नियम आहेत त्या नियमांच्या चौकटीत राहून सुरू करावी, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसारच पुढचे पाऊल रेल्वेकडून टाकण्यात आले आहे.
पुणे विभागात लोकलसेवा पूर्ववत करण्याबाबत समन्वय ठेवण्यासाठी सरकारकडून पुणे पोलीस आयुक्तांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांची आयुक्तांशी बैठक होऊन त्यात लोकलसेवा सुरू करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. येत्या १२ ऑक्टोबरपासून पुणे-लोणावळा मार्गावर लोकल सुरू करण्यात येतील. सुरुवातील केवळ दोन ते तीन गाड्याच या मार्गावर धावतील. त्यात केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारीच प्रवास करू शकतील, असे पुणे विभागातील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हावडा- मुंबई- हावडा गाड्या रोज धावणार
हावडा- मुंबई- हावडा तसेच हावडा- अहमदाबाद- हावडा या नागपूर मार्गे जाणाऱ्या गाड्या आता दररोज धावणार आहेत. लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी या गाड्या रोजच धावत होत्या. नंतर रेल्वेने प्रवाशी वाहतूक बंद झाल्यामुळे या गाड्याही बंद झाल्या. त्यानंतर रेल्वेने काही विशेष गाड्या सुरू केल्या. त्यात या गाड्या सुरू झाल्या मात्र दररोज ऐवजी आठवड्यातून एक दिवस त्या सोडण्यात येत होत्या. पुढे प्रवाशांचा प्रतिसाद पाहता त्यात वाढ करून त्या आठवड्यातून तीनदा करण्यात आल्या मात्र आता प्रवाशांची गर्दी वाढल्याने या गाड्या रोज सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्यांचा तपशील असा- ०२८१० हावडा- मुंबई विशेष गाडी ६ ऑक्टोबरपासून रोज धावेल. ०२८०९ मुंबई- हावडा ही गाडी ८ ऑक्टोबरपासून रोज सुटेल. ०२८३४ हावडा- अहमदाबाद ही गाडी ७ ऑक्टोबरपासून रोज धावणार आहे, तर ०२८३३ अहमदाबाद – हावडा ही विशेष गाडी १० ऑक्टोबरपासून आठवड्यात प्रत्येक दिवशी धावणार आहे. या गाड्यांचे थांबे किंवा कोच रचना यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी या गाड्या आता रोज नियमित झाल्याची नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times