नवी दिल्लीः जेएनयुतील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि माकपचे नेते हे भाजपचे कट्टर विरोधक मानले जातात. भाजपच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे अनेकदा ते चर्चेत असतात. पण पंतप्रधान मोदींवर कायम खरमरीत टीका करणाऱ्या कन्हैया कुमार यांनी आता त्यांचं उघडपणे कौतुक केलं आहे. ‘मी आंधळा समर्थक नाही. मी पीएचडी केलेली आहे आणि एक संशोधक म्हणून कोणत्याही गोष्टीत तटस्थ राहून त्यातील उणीवा आणि चांगल्या बाबाही पाहू शकतो’, असं कन्हैया कुमार म्हणाले आहेत.

राजकीय अनुभव

पंतप्रधान मोदींचा राजकीय अनुभव हा मोठा आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. जमिनीवर घट्ट पाय रोवून असलेल्या अशा माणसाला उखडून टाकणं खूप कठीण आहे. मोदींचा राजकीय अनुभव हिच त्यांची शक्ती आहे, अशी कबुली कन्हैया कुमार यांनी दिली.

गरिबाचा मुलगाही पंतप्रधान होऊ शकतो

गरीबाचा मुलगा पंतप्रधान होऊ शकत नाही, असं म्हटलं जातं. पण मोदींनी पंतप्रधान होऊन ते खोडून काढलं आहे. एक सामान्य गरीबाचा मुलगाही मेहनतीच्या बळवार पंतप्रधान बनू शकतो, हे मोदींनी सिद्ध केलं आहे, असं कन्हैया कुमार म्हणाले.

पंतप्रधान झाल्यावर मोदींची ताकद अधिक वाढली आहे. मोदींनी सत्ता मिळवली आणि ती टिकवूनही ठेवली. यातूनच त्यांचं वेगळेपण सिद्ध होतं, असं कन्हैया कुमार म्हणाले.

योजनांचे जादूगार

पंतप्रधानांनी सुरू केलेल्या सार्वजनिक योजनांचेही कन्हैया कुमार यांनी कौतुक केले. मोदी योजनांची घोषणा करतात तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकण्यासारखं असतं. बेटी बचाओ, डिजिटल इंडिया आणि शौचालय बांधण्यासारख्या योजना वाखाणण्यासारख्या आहेत. मोदी हे विरोधकांचे मोकळ्या मनाने मूल्यांकन करतात आणि त्यांचा चांगुलपणा स्वीकारतात. ही त्यांची खासियत त्यांना विशिष्ट बनवते, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी चुकीचे आहेत तिथे नक्कीच विरोध करणार. निषेधही करतो. मोदी म्हणतात मी स्टेशनवर चहा विकत होतो. पण ते स्टेशनच विकायला विकायला निघालेत. बेटी बचाओ च्या गप्पा मारतात. मग कुलदीप सेंगर सारखे नेते तुमच्याकडे कसे काय? असा प्रश्न कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला. द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत कन्हैया कुमार बोलले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here