सांगली: मधील तरुणीवर बलात्कार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या झाल्याने पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाने सोमवारी राज्यभर ५०० गावांमध्ये आंदोलन केले. या आंदोलनात १५ हजारांहून जास्त आंदोलकांनी सहभाग घेतला. सरकार आणि प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे, असा आरोपही या संघटनेने केला आहे. दरम्यान, दलित आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी ‘जाती तोडो-समाज जोडो’ हे अभियान आणखी व्यापक करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला.

वाचा:

आंदोलनाबाबत माहिती देताना डॉ. म्हणाले, ‘हाथरसमधील तरुणीवर झालेला बलात्कार, त्यानंतर तिची जीभ कापणे, तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करणे या साऱ्याच घटना संशयास्पद आहेत. यापूर्वीही बिहार राज्यात बेलची गावात अशीच घटना घडली होती. महाराष्ट्रातील ते हाथरस पर्यंतच्या हजारो घटना आपल्या समोर आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. हाथरसमधील घटनेमागे जातवर्चस्व आणि जातीय अहंकार आहे. पीडितेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होऊन तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. याबरोबरच जातीय आणि स्त्रीयांवरील अत्याचाराच्या घटना थांबायच्या असतील तर उतरंडीची जातीव्यवस्था संपली पाहिजे. तिच्या अंताची चळवळ तीव्र केली पाहिजे, तरच या घटना कायमच्या थांबतील. म्हणून जाती अंताची चळवळ तीव्र करण्याचा निर्धार श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.’

वाचा:

‘जाती तोडो-समाज जोडो’ ही श्रमिक मुक्ती दलाची दुसरी घोषणा आहे. येणाऱ्या काळात हे अभियान अधिक व्यापक केले जाईल. सोमवारी केलेल्या आंदोलनात ८० टक्के सवर्णांचा सहभाग होता. राज्यात ५०० गावांमध्ये एकाच दिवशी पंधरा हजारांहून अधिक लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला. अनेक लोकांनी गावात सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हाथरसमधील घटनेचा निषेध केला. काही ठिकाणी लोकांनी त्यांच्या घराबाहेर उभे राहून निषेध नोंदवला,’ अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. डॉ. पाटणकर यांच्यासह कॉम्रेड संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, मोहन अनपट, चैतन्य दळवी, डी. के. बोडके, संतोष गोटल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here