पुणे: संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत या कारणासाठी बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्जदारांची शारीरिक आणि मानसिक पिळवणूक करू नये; तसेच अवैध मार्गाने वसुली करण्यात येऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून या आठवड्यात बँकांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत बँकांना सूचना देण्यात येणार आहेत. ( Pune Collector On )

वाचा:

काळात कर्जांच्या हप्तेवसुलीला सूट देण्यात आली असली, तरी काही बँकांकडून कर्जवसुलीसाठी कर्जदारांना तगादा लावण्यात येत आहे. कर्ज वसुलीसाठी सक्तीच्या उपाययोजना करणे, तगादा लावणे, बळाचा वापर करणे, कर्जदाराला धमकावणे या प्रकारचे वसुलीचे मार्ग काही बँका व वित्तीय संस्थांकडून वापरण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकांची बैठक घेण्यात येणार आहे.

वाचा:

याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ‘बँकांनी कर्जदारांची पिळवणूक करू नये, यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. कर्जदारांच्या मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीत, यादृष्टीने बँकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात येणार आहेत.’

दरम्यान, अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली, तरी अनेक कर्जदार हे अडचणीत आहेत. मात्र काही बँका आणि वित्तीय संस्था या कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावत आहेत. तसेच अवैध मार्गाने वसुली करण्यात येत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांची बैठक घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार या आठवड्यात बँकांची बैठक घेतली जाणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here