दिल्लीतील निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींचा खटला लढणारे वकील ए.पी. सिंह आता हाथरस प्रकरणात आरोपींचे वकील असणार आहेत. ते हा खटला लढणार, असल्याचं सांगण्यात येतंय. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने आरोपींच्या बाजूने कोर्टात खटला लढण्यासाठी ए. पी. सिंह यांची वकील म्हणून नेमणूक केली आहे, आज तकने हे वृत्त दिलं आहे.
माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांच्या वतीने ए. पी. सिंह यांना हाथरस आरोपींचा खटला लढवण्यास सांगण्यात आलं आहे. मानवेंद्र सिंह यांनी या प्रकरणी पत्रक जारी केलं आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा देणगी जमा करून वकील ए.पी. सिंह यांची फी भरेल, असं मानवेंद्र सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.
हाथरस प्रकरणाच्या माध्यमातून एससी-एसटी कायद्याचा दुरुपयोग करून सवर्णांची बदनामी केली जात आहे. यामुळे खासकरुन राजपूत समाजाला इजा झाली आहे. या प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी आरोपींच्या वतीने ए. पी. सिंह यांची वकील म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हाथरस प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबीयांनीही ए. पी. सिंह यांना वकील म्हणून नेमण्याचा आग्रह करण्यात आलं आहे, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times