करोना बाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी शासन अधिसूचनेनुसार खाजगी रुग्णालयांना विविध उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित केली आहे. तथापि अद्यापही खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक दर आकारण्याबाबत शासनस्तरावर तक्रारी दाखल होत आहेत. काही ठिकाणी डॉक्टरांनी लेखापरीक्षकानाच मॅनेज केले. त्यामुळे तक्रार केली तरी त्याची शहनिशा होत नसल्याच्या काही घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.
या भरारी पथकात अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे,वरिष्ठ लेखापरिक्षक दिपक कुंभार आणि परवाना अधिक्षक राम काटकर यांचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times