संगरुर/ पतियाळाः कॉंग्रेस नेते हे केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘शेती वाचवा’ ( ) आंदोलनासाठी पंजाबच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कॉंग्रेसच्या या आंदोलनात मोठ्यासंख्येने रस्त्यांवर ट्रॅक्टर उतरले आहेत. पण आंदोलनादरम्यान होत असलेल्या सभांना मात्र शेतकऱ्यांची म्हणावी तशी उपस्थित नाहीए. राहुल गांधी आणि इतर कॉंग्रेस नेत्यांची भाषणं ऐकण्यासाठी फारच कमी शेतकरी पोहोचत आहेत.

संगरूरमधील समाना येथे सोमवारी आयोजित आंदोलनात अनेक ट्रॅक्टर दिसले. परंतु राहुल गांधींचे भाषण ऐकण्यासाठी फारच कमी नागरिक सभेला गेले. सभेच्या ठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. राहुल गांधी भाषण देत असताना अनेक जण सभेच्या बाहेर ट्रॅक्टर चालवताना दिसले. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक ट्रॅक्टर चालकास किमान ५०० रुपयांचे डिझेल दिले जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

असंच काहीसं दृश्य रविवारी कॉंग्रेसच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनाच्या पहिल्या दिवशीही पाहायला मिळाले होते. मोगामधील सभेत राहुल गांधी यांनी भाषणाला सुरवात करताच नागरिक सभा सोडून घराकडे जाताना दिसले, इंडिया टुडेने हे वृत्त दिलंय.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू भाषण देईपर्यंत नागरिक बसले होते. कदाचित ते त्यांच्या पंजाबी भाषणामुळे होते. पण राहुल गांधी यांचे भाषण सुरू होताच अनेकांनी सभास्थळ सोडण्यास सुरवात केली, असं चित्र होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here