मुंबई : एकीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडत असले तर कंपन्यांनी मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे मुंबईसह देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधन दर स्थिर ठेवले. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

वाचा : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली आहे. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले आहे. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली आहे. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला आहे. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण कायम आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३७.४० डॉलर प्रती बॅरल इतके खाली आले. त्यात ३.४१ टक्क्यांची घसरण झाली होती. ट्रम्प दाम्पत्य करोनाबाधित झाल्यांनतर कमॉडिटी बाजारावर पडसाद उमटले. आज मात्र कच्च्या तेलाच्या किमती किंचित सुधारण झाली. सध्या क्रूडचा भाव प्रती बॅरल ३९ ते ४० डॉलर प्रती बॅरल आहे.

कोव्हिड-१९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे गुंतवणूकदारांमधील क्रूडच्या मागणीवर परिणाम झाला. या चिंतेमुळे मागील आठवड्यात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ८ टक्क्यांनी घसरले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येतील वाढीमुळे जागतिक तेल बाजारात मोठी घसरण होणे सुरुच आहे. जगाच्या अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीवर आणखी दबाव आला. घटत्या मागणीला सामोरे जाण्यासाठी जानेवारी २०२१पासून ओपेक तेलाचे उत्पादन वाढवण्याचे नाकारत आहे. मात्र ओपेकच्या उत्पादन कपातीनंतरही लिबिया आणि इराणमधील निर्यात वाढल्याने द्रवरुपी सोन्याच्या दरात कपात दिसून आली. तथापि, अमेरिकेकडून आणखी मदत मिळण्याच्या आशेने कच्च्या तेलाच्या दर घसरणीवर मर्यादा येऊ शकतात,असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here