म. टा. प्रतिनिधी, मुंबई

जेमतेम महिन्याभरावर आलेल्या दिवाळीनिमित्त ाकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहे. करोना संकटामुळे ओढवलेल्या परिस्थितीत वाढवल्यास प्रवाशांचा रोष ओढवण्याची शक्यता असल्याने दरवर्षी होणारी हंगामी दरवाढ यंदा रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

लॉकडाउनच्या काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. अनेकांवर पगार कपातीचे संकट ओढावले. आता अनलॉकमध्ये हळूहळू सर्व क्षेत्रे सुरू होत आहेत. कामानिमित्त नोकरदार वर्गांचा प्रवास सुरू झाला असून एसटी वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.

दरवर्षी दिवाळीच्या दीड ते दोन महिन्यांआधी एसटीच्या दिवाळी नियोजनाची सुरूवात होते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे. तरी देखील महामंडळात एसटी दिवाळी नियोजनाची बैठक पार पडलेली नाही. गणपती, नवरात्रीप्रमाणे आता दिवाळीवरही करोनाचे सावट कायम आहे.

आजही राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा करोना संसर्गाची भीती कायम आहे. एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होऊन ही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय करोनामुळे आलेली आर्थिक मंदीमुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला. अशा काळात एसटीची तिकीट दरवाढ झाल्यास महामंडळाला सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची मोठी शक्यता आहे, असे एसटी अधिकारी सांगतात.

दरम्यान, गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळाला १० ते ३० टक्क्यांपर्यंत तिकीट दरवाढीची मुभा परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. त्यानुसार महामंडळाला हंगामी तिकीट दरवाढीची मुभा आहे.

सर्वांनाच भुर्दंडाची शक्यता

हंगामी दरवाढीमुळे १०० ते १५० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न महामंडळाला मिळते. सध्या एसटीच्या राज्यात ७ हजार गाड्या सुरू असून यातून सुमारे ७ लाख प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशात प्रवासी वाहतुकीची मुख्य जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. यामुळे भाववाढ केल्यास सरसकट सर्वच एसटीतील प्रवाशांना तिकीट दरवाढीचा सामना करावा लागेल.

कोविड काळ आणि त्यामुळे झालेल्या प्रवाशांच्या प्रतिसादावर परिणाम पाहून हंगामी दरवाढीवर निर्णय घेण्यात येईल. लवकरच दिवाळी नियोजनाबाबत, वाहतुकीबाबत बैठक घेण्यात येईल. तूर्तास एसटी तिकीट दर आहे तसेच ठेवायचे की दर वाढवायचे याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

-अनिल परब, परिवहन मंत्री आणि अध्यक्ष एसटी महामंडळ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here