वृत्तसंस्था, हाथरस/लखनौ :

हाथरस बलात्कार कांडातील चार आरोपींना ज्या तुरुंगात ठेवले आहे, तिथे सोमवारी हाथरसचे यांनी भेट दिल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले. आपण आरोपींना भेटायला गेलो नाही, असा खुलासा त्यांना करावा लागला. यानंतर लगेचच हाथरस बलात्कार कांडातील चार आरोपींना भाजप खासदार दिलेर भेटायला गेल्याची चर्चा सुरू झाली. पण आपण एका परिचिताला भेटलो. तुरुंगात कोणाला भेटायला गेलो नाही, असे दिलेर यांनी स्पष्ट केले. हाथरस बलात्कारकांडानंतर दिलेर यांच्यावर आरोपींच्या समर्थकांकडून टीकेची झोड उठली असून हाथरस आणि अलीगड जिल्ह्यांमध्ये त्यांचे पुतळे जाळण्यात आले. त्यामुळे ते तुरुंगात आरोपींची भेट घ्यायला गेले असावे, अशी चर्चा सुरू झाली होती.

‘आप’ नेत्यांवर शाई हल्ला

दरम्यान, हाथरसमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि आमदार राखी बिर्ला यांच्यावर शाईने हल्ला करण्यात आला. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेलेले आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजय सिंह आणि आमदार राखी बिर्ला यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वाचा :

वाचा :

‘वंचित घटकांना धोका’

देशातील महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारावर संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) भारतातील कार्यालयाने चिंता व्यक्त केली आहे. ‘समाजाच्या वंचित घटकातील महिला व मुलींना लिंगआधारित हिंसेचा अधिक धोका आहे,’ असे ‘यूएन’ने सोमवारी निवेदनात म्हटले आहे. ‘सामाजिक निर्देशांकात उल्लेखनीय प्रगतीनंतरही वंचित वर्गातील महिला व मुलींना लिंगआधारित हिंसेचा अधिक धोका सहन करावा लागत आहे, हे उत्तर प्रदेशच्या हाथरस व बलरामपूर येथील कथित बलात्कार व हत्या प्रकरणातून स्पष्ट होते,’ असे ‘यूएन’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोदी गप्प का?‘हाथरस घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का,’ असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी कोलकातामध्ये केला आहे. तसेच, मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ऐवजी आता ‘शट अप इंडिया, हश अप इंडिया’चा नारा द्यावा, अशी टीकाही त्यांनी केली.

वाचा :

वाचा :

योगींच्या बदनामीचा कट

हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांच्या आडून हाथरसमध्ये जातीय दंगली घडवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बदनामी करण्याचा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. हा कट सुरक्षा यंत्रणांनी उघड केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हाथरस पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यात देशद्रोहासह अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

हाथरसमधील १९ वर्षांच्या पीडितेच्या खून प्रकरणावरून देशभरातील वातावरण तापले असून राजकीय नेते आणि कार्यकर्ते पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेत आहेत. मात्र, ही आंदोलने म्हणजे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या बदनामीचा कट असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. त्यातच जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात रविवारी दुपारी चंदपा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेअंतर्गत १९ आरोपांचा समावेश आहे.

हाथरस घटनेशी संबंधित तथ्ये आणि उत्तर प्रदेश सरकारच्या निवेदनांमध्ये फेरफार करून ती सोशल मीडियावरून प्रसारित केली जात आहेत. तसेच, प्रतिष्ठित वर्तमानपत्रांचे बनावट लोगो वापरून दिशाभूल करणारा मजकूरदेखील शेअर केला जात असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले. काही आरोपी जातीय दंगलींना कारणीभूत ठरणारी सामग्री प्रसारित करीत आहेत आणि सद्यस्थिती लक्षात घेता हे गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे या प्रकरणी तपास सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस पोलिसांनी आत्तापर्यंत दलित पीडितेच्या खून प्रकरणासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सुमारे डझनभर तक्रारी नोंदवल्या असून सायबर सेलमार्फत त्यांची चौकशी सुरू आहे.

आंदोलकांच्या मदतीसाठी वेबसाइट

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांना http://justiceforhathrasvictim.carrd.co/ ही वेबसाइट आढळली आहे. या साइटला मुस्लिम देशांकडून आर्थिक मदत मिळत होती. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेशी या साइटच्या कथित संबंधांचीही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. जास्तीत जास्त लोकांनी आंदोलनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतानाच दंगल भडकल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केल्यास त्यापासून आणि अटकेपासून कसे वाचायचे याचे धडेही या साइटवर देण्यात येत होते, असे सूत्रांनी सांगितले. काही तासांमध्ये हजारो लोक बनावट आयडीद्वारे या वेबसाइटशी जोडले गेले आणि त्यानंतर सोशल मीडियावर हाथरसशी संबंधित अफवा व खोट्या बातम्या पसरवू लागले. सुरक्षा यंत्रणा सक्रीय होताच ही वेबसाइट बंद करण्यात आली. मात्र या वेबसाइटवरील फोटोशॉपद्वारे तयार केलेले फोटो, खोट्या बातम्या, संपादित केलेली दृश्ये आदी मजकूर सुरक्षा यंत्रणांकडे सुरिक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here